राग, अहंकार यामुळे आपलं नुकसान कसं होते ?

~www.Suvicharkatta.in

एका लोहाराच्या बंद दुकानामध्ये अचानक एक साप घुसला. दुकानात इकडे तिकडे फिरताना तिथे पडलेल्या करवतामुळे त्याला थोडी किरकोळ जखम झाली. सापाने मागे वळून पुर्ण ताकदीने करवताला चावलं.

~www.Suvicharkatta.in

त्यामुळे सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. त्यानंतर सापाने जास्तच चिडून स्वतःला आपल्या स्वभावाप्रमाणे करवतभोवती गुंडाळून, बांधून, गुदमरुन मारण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.

~www.Suvicharkatta.in

दुसऱ्या दिवशी लोहाराने जेव्हा दुकान उघडले तेव्हा त्याला करवताभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला. जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता.

~www.Suvicharkatta.in

कधी-कधी आपल्याला जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना, काही अपघातांना, एखाद्याच्या बोलण्याला लक्षपूर्वक दुर्लक्ष करायला पाहीजे

~www.Suvicharkatta.in

आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवायलाच हवी. बऱ्याचवेळा आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात

~www.Suvicharkatta.in

अजून नवीन मराठी मराठी मध्ये माहिती  पाहण्यासाठी