marathi ukhane | नवनवीन मराठी मध्ये सुंधर उखाणे
marathi ukhane:उखाणे ही मराठी संस्कृतीतील एक अनमोल परंपरा आहे, जी विवाह, गृहप्रवेश, आणि इतर अनेक शुभ प्रसंगी आनंदाने घेतली जाते. या चटकदार व भावनिक उखाण्यांतून वधू-वर एकमेकांची नावे घेतात, ज्यामुळे त्यांच्या प्रेमाचे आणि नात्याचे प्रतीकात्मक दर्शन होते. मराठी समाजात उखाणे केवळ एक परंपरा नसून, ती एक प्रकारची कलात्मक अभिव्यक्ती आहे, ज्यामध्ये हळुवार शब्दांचे मिश्रण असते.
उखाण्यांची मुळं आपल्या लोकपरंपरेत खोलवर रुजलेली आहेत. सण-समारंभांमध्ये या उखाण्यांचा गोडवा आणखी वाढवतो. वधू-वरांनी एकमेकांचे नाव घेताना दिलेला हा आदर आणि प्रेमाचा इजहार त्यांच्या नात्यात एक नवीन रंग भरतो. या लेखात आपण विविध प्रसंगी वापरता येणाऱ्या उखाण्यांचे संकलन पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या सोहळ्याला नवा आयाम मिळेल.
उखाणे घेताना त्यात असलेली सुसंगती, त्यातील शब्दांची गुंफण आणि त्यातून प्रकट होणारी भावना या सर्वांचा विचार केला जातो. त्यामुळेच प्रत्येक उखाणा हा एक स्वतंत्र कला प्रकार मानला जातो. चला तर मग, या लेखातून मराठी उखाण्यांच्या या अद्भुत जगात डोकावून पाहूया.
Table of Contents
नावरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
……………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
marathi ukhane
मायामय नगरी, प्रेममय संसार,
…….. च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
………….. चे नाव घेतो …….. रावांचा पठ्ठा.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
……………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
………………. माझी सर्वांपेक्षा सुंदर.
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,
…………. मुळे लागली मला संसाराची गोडी.
श्रावण महिन्यात असतात खूप सण,
……………… सुखात ठेवीन हा माझा पण.
एक होती चिऊ, एक होता काऊ,
……………चे नाव घेतो डोक नका खाऊ.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
…………….. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
…………….. आहे माझे जीवन सर्वस्व.
सूर्य चंद्राला पाहून, भरती-ओहोटी येते सागराला,
…………….. ची जोड मिळाली, माझ्या जीवनाला.
दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग,
सुखी आहे संसारात ………….. च्या संग.
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी ………. नाजूक जसे गुलाबाचे फूल.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
………. सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
………………. बरोबर बांधली जीवन गाठ.
अस्सल सोने चोविस कॅरेट,
……….. अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
…… च्या गळ्यात घातला मंगळ सुत्राचा हार,
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
………………. च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
श्रीकृष्णाने केला पण, रुक्मिणीलाच वरीन,
…………… च्या सोबत, आदर्श संसार करिन.
चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण,
………………. चं नाव घेऊन बांधतो कंकण.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल,
……………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
Marathi Ukhane for Female| नवरी साठी मराठी उखाणे
जन्मात एक झाली, हि प्रितभेट देवा,
……………. राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.
marathi ukhane
नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
……………….. रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.
दूर डोंगरापल्याड, नदीकाठी माझे गाव,
…………….. रावांना आवडले फार, म्ह्णून माझ्या पुढे त्यांचे लागले नाव.
अरेंज म्यॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, याची होती भिती,
परंतु …………………. रावांच्या येण्याने, बदलली माझी स्तिथी.
खुश ठेवा मला, नको माणिकमोती,
………… राव नेहमी ऱ्हावा, तुम्ही माझ्यासोबती.
खूप संकट आले, पावलो पावली,
………………. रावांच्या घरात, अखेर भेटली मला सावली.
जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात,
……………… आणि …………. ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.
गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
……………. रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.
देवळात प्रवेश करण्यासाठी, नाही कुणाला बंदी,
………….. रावांच्या आयुष्यात येण्याची, भेटली मला संधी.
लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
………….. रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???
हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते,
………………. राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.
घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला,
………………. रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.
आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे,
……………… रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.
दोन जीवांचे, जातक जुळले,
……………… रावांमुळे सुख काय आहे, ते कळले.
हिरवा चाफा, कमळ निळे,
……………. मी सुखी आहे, कारण तुमच्यामुळे.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
……….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
आमचे लग्न होईल कि नाही,
अखेर स्वप्न झाले साकार,
………. रावांनी खूप कष्ट केले,
मिळण्यासाठी घरंच्याकडून होकार.
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
……………… रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती,
आज झाले …………. रावांची सौभाग्यवती.
marathi ukhane
सोपे उखाणे | Easy Ukhane
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
………. रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
……….. रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून,
……….. रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून.
हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी,
………. झाली आता माझी सहचारिणी.
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण,
……..ला सुखात ठेवी हा माझा पण.
इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी,
……… मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.
रोज सकाळी उठुन पितो मी भरपुर पाणी,
……………… चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.
रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा,
जीवनाचा खेळ समजला ………… मुळे सारा.
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,
…………… मुळे झाले संसाराचे नंदन.
भाजीत भाजी पालक,
………… माझी मालकिन अन् मी मालक.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल,
…………… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
…………. ची व माझी जडली प्रिती.
जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
………… रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद.
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
……….. रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना.